जीएसटी : एक विराट संभ्रम!
अतिशय अपुरी तयारी, गोंधळलेले असंख्य उद्योजक, संतापलेल्या व्यापारी संघटना, आपण वस्तू आता घेतल्या की, स्वस्त पडतील का नंतर, या विवंचनेत असलेला ग्राहक वर्ग, या सगळ्याचे केविलवाणे समर्थन किंवा दुबळा विरोध करणारे राजकीय पक्ष, रोज नवी परिपत्रके काढणारी जीएसटी कौन्सिल आणि ‘वाट्टेल ते झालं तरी जीएसटी १ जुलैलाच आणू’ अशी मग्रूर जिद्द बाळगणारे सरकार... या दुसऱ्या ‘नियतीशी करारा’मागचे वास्तव हे असे भीषण आहे.......